Maha Hit 24
Register

जाहिरात

 

9 महिन्यांच्या बाळाला विष देऊन आईचे धक्कादायक पाऊल

schedule29 Jun 24 person by visibility 98 categoryगुन्हे

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील शेगाव येथे एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. आईने आपल्या 9 महिन्यांच्या बाळाला विष देऊन मारले आणि त्यानंतर स्वतः चाही अंत केला. या घटनेने संपूर्ण शेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील रोरा तालुक्यातील शेगाव येथील नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपूर्वी पल्लवी हिच्यासोबत लग्न झाले. त्यांना ९ महिन्याचा मुलगा आहे. पारोधे यांचा मुलगा घरातच बेशुद्ध अवस्थेत आढळला तर त्याची आई, पल्लवी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

 या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्र सिंह यादव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अवघ्या या 9 महिन्यांच्या मुलाला तिने आत्महत्येपूर्वी विष दिल्याचे झाले निष्पन्न झाले. त्या मुलाला चंद्रपुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पल्लवी हीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आला .


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes