Maha Hit 24
Register

जाहिरात

 

विश्वासराव नाईक सहकारी कारखान्यास रशियातील पदाधिकाऱ्यांनी भेट

schedule20 Sep 24 person by visibility 98 categoryकोल्हापूर

पोपट पाटील / चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यास रशियातील ‘‘पीजेएससी एक्रोन’’ या कंपनीकडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यामध्ये पीजेएससी एक्रोन कंपनीच्या क्रेडिट आणि गुंतवणूक समितीचे उपाध्यक्ष वसिली झत्सेपिन, तांत्रिक आधुनिकीकरण विभागाचे प्रमुख मिखाईल निकोलायव, इन्स्ट्रुमेंट तज्ञ अलेक्सेई पेटुकोव्ह आदींचा सहभाग होता. 

त्यांनी कारखान्याने सह वीजनिर्मिती प्रकल्पासाठी बसविलेल्या ‘एनकॉन’ कंपनीच्या ७ मेगावॉट क्षमतेचे जनित्र (टर्बाईन) माहिती घेतली. अशाप्रकारचे जनित्र टर्बाइन बसणारा ‘विश्वास’ देशातील पहिला कारखाना आहे. हे जनित्र (टर्बाईन) गेल्या एक वर्षापासून प्रकल्पात कार्यरत असून ते इतर कंपन्यांच्यापेक्षा चांगले आहे. यातून ‘स्टीम कंन्सप्सशन’ अत्यंत कमी होते. क्षमता वापर चांगली आहे, अशी माहिती कारखाना व्यवस्थापक, मुख्य अभियंता दीपक पाटील, तसेच अभियंता बाबा पाटील व सुरेश कांबळे यांनी दिली. या जनित्राची (टर्बाईन) पाहणी, कार्यक्षमता तपासणी व तांत्रिक माहिती रशियातून आलेल्या पथकाने घेतली. कारखान्यात प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या पथकाने कारखान्याचे संचालक श्री. विराज नाईक यांची भेट घेतली. प्रारंभी कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. संचालक श्री. नाईक यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी पीजेएससी एक्रोन कंपनीचे अधिकाऱ्यांनी त्यांना आवश्यक असलेली माहिती घेतली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes