ग्राहकांना मोठा दिलासा ; सोने चांदीचे दर घसरले
schedule27 Jun 24 person by visibility 146 categoryउद्योग

आजच्या बाजारात सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. गेल्या दोन आठवड्यात सोन्याने अखरेच्या सत्रात मुसंडी मारल्याचे दिसून येते. या आठवड्यात 24 जून रोजी सोन्यात 150 रुपयांची घसरण झाली. तर दुसऱ्या दिवशी भावात बदल झाला नाही. बुधवारी 27 जून रोजी 230 रुपयांनी भाव उतरला. तर गुरुवारी सकाळच्या सत्रात किंमती घसरल्याचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गेल्या आठवड्यात चांदीत 3000 रुपयांची वाढ नि 2000 रुपयांची घसरण झाली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला 24 जून रोजी 300 रुपये तर 25 जून रोजी 700 रुपये अशी एकूण 1000 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. 26 जून एक हजारांनी किंमती कमी झाल्या. तर गुरुवारी सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत दिसत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,000 रुपये आहे.