काळभैरव यात्रेनिमित्त भव्य खुल्या बैलगाडा स्पर्धा
schedule29 Feb 24 person by visibility 155 categoryक्रीडा

रिळे (ता. शिराळा) : येथील काळभैरव यात्रेनिमित्त भव्य खुल्या बैलगाडा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यास सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष विराज नाईक प्रमुख उपस्थितीत होते. श्री. नाईक यांनी बैलगाडा शर्यतींचा आनंद घेतला.
यावेळी माजी सरपंच एम. एस. पाटील, भेडसगांव (ता. शाहूवाडी) सरपंच अमर पाटील, तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील, विजय पाटील, सुशांत आढाव, दीपक खामकर यांच्यासह बैलगाडा प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.