भारतीय शेअर बाजारात गुरुवारी तेजी
schedule27 Jun 24 person by visibility 163 categoryउद्योग

मुंबई: भारतीय शेअर बाजारात आज तेजीची नोंद झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांक गाठला आहे.. मुंबई सेन्सेक्सने आता 79 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीने 24 हजारांचा नवीन रेकॉर्ड नावे केला आहे. व्यापारी सत्रात नवीन उच्चांकावर पोहचल्यानंतर दोन्ही निर्देशांक खाली घसरले. त्यानंतर ते सावरले. सेन्सेक्स 196.19 अंकांसह 78,876.54 अंकावर व्यापार करत होता. तर निफ्टी 38.25 अंकांसह 23,900 अंकावर होता.
बीएसई सेन्सेक्सने आज 78,771.64 हा नवीन विक्रम गाठला. बाजार सकाळापासूनच एका मर्यादेत व्यापार करत होता. सेन्सेक्सचे 30 मधील 12 शेअर उसळीसह कारभार करत आहेत. तर 18 शेअरमध्ये घसरण आली आहे. अल्ट्राटेक सिमेंटने मोठी झेप घेतली आहे. कंपनी आज बाजारात टॉप गेनर ठरली.तर त्यानंतर जेएसडब्ल्यू स्टीलने मोठी दमदार कामगिरी केली.