परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
schedule30 Aug 24 person by visibility 99 categoryकोल्हापूर
कोल्हापूर : अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता सन 2024-25 मध्ये परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने मंजूरी दिली आहे.
याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी संकेस्थळावर जाऊन भेट द्यावी व अर्ज डाऊनलोड करुन तो परिपुर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 6 सप्टेंबर 2024 रोजी सायं. 6.15 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाजकल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे 411001 येथे सादर करावा, असे अवाहन पुणे समाज कल्याण विभागाच्या आयुक्तांनी केले आहे.